संवाद मीडिया डिजिटल न्यूज चॅनलच्या क्रीडा विभाग प्रमुख पदी बाळा मडगावकर
सावंतवाडी जिमखाना येथील मॉर्निंग बॉईज क्रिकेट प्रेमींकडून अभिनंदन; अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून विशेष ओळख
सावंतवाडी
संवाद मीडिया डिजिटल न्यूज चॅनलच्या क्रीडा विभागाचे प्रमुख म्हणून सुरेंद्र उर्फ बाळा मडगावकर यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सावंतवाडी जिमखाना येथील मॉर्निंग बॉईज क्रिकेट प्रेमीनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र रणजीपटू निखिल नाईक, दिलीप सांगावकर, उद्योजक साई हवालदार, सुनिल सावंत, सर्वेश सावंत, अरुण लके, हर्ष परब, महेश पावसकर, दाजी पेडणेकर, राजा राणे, मयुरेश सावंत, प्रवीण सावंत, राजन शिरोडकर, स्वप्नील शिरोडकर, संदीप तळेकर, गुरुनाथ पै, मनोज सावंत, वासुदेव बांदेकर, प्रमोद भागवत, दिनेश भोसले, स्वप्निल चेंदवणकर, मुन्ना कोरगावकर, उमेश निकम, सुजल चोडणकर, ओंकार ढवळे, बाबी धुरी, संदीप कांदे, आनंद म्हापसेकर, दिनेश मोरये, आदी मॉर्निंग बॉईज चे सदस्य उपस्थित होते.
बाळा मडगावकर हे अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. शालेय जीवनापासूनच त्यांना क्रिकेटची आवड असून गेली अनेक वर्षे ते लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.क्रिकेटवर असलेली त्यांची निष्ठा, खेळातील अनुभव आणि क्रीडा क्षेत्राशी असलेली जवळीक,यामुळे त्यांची सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्यात व शेजारील गोवा राज्यात विशेष ओळख आहे.
संवाद मीडिया डिजिटल न्यूज चॅनलच्या क्रीडा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्थानिक तसेच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल क्रिकेट प्रेमी कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
