मालवण /आचरा (प्रतिनिधी) : आचरा वरचीवाडी येथील भगवंतगड फाटा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘गावकर बंधूंच्या मालवणी ढाबा’ या हॉटेलचे उद्घाटन उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी तथा चिंदर गावच्या माजी सरपंच श्रीमती सुषमा गावकर यांच्या या नव्या व्यवसायाच्या प्रारंभानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आजरा सरपंच जेरोन फर्नांडिस, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, विभागप्रमुख संतोष कोदे, बाबू परळेकर, अभय भोसले, चिंदर विभागप्रमुख भाऊ हडकर, मनोज हडकर, दत्ता वराडकर, अनिल करंजे, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर आणि राजवी सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आचरा परिसरात नव्याने सुरू झालेल्या या व्यवसायामुळे स्थानिक व्यावसायिक क्षेत्रात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. यावेळी उपस्थितांनी गावकर कुटुंबीयांना त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
