*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आळवीतसे सुराला*
सतारीचे सूर छेडीत, प्रार्थी ती शारदेला
मग्न, बेधुंद होऊनी, आळवितसे सुराला ||धृ||
मंद मधुर गोड धून, मधुर ती सुरावट
भारलेली मैफल अन् , सुर ते अनवट
उतरली परीरूपे “मॉ”, आशीष द्याया साधिकेला
मग्न बेधुंद होऊनी,आळवीतसे सुराला. —||१||
संगीत साधना एक तप, वर्षानुवर्षे व्यासंग
ध्यास, ध्येय, धून लय, मनांत प्रेरक उमंग
फळ अजि मिळाले या,मंगल तपाचरणाला.
मग्न बेधुंद होऊनी, आळवीतसे
सुराला ||२||.
नादावलेली ही घटिका, सुरात
रमलेली तरूणी
मुखावर विलसतसे, सुंदर ती प्रभा आरूणी
वाह् वाह् गुंजतसे, कुर्नीसात कांचन योगाला.
मग्न बेधुंद होऊनी, आळवितसे
सुराला||३||
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
