You are currently viewing कुडाळ नगरपंचायतच्या अधिकारी व संबंधीत कंपनीच्या विरोधात कुडाळ न्यायालयात कचरा प्रकरणी खाजगी फिर्याद दाखल….

कुडाळ नगरपंचायतच्या अधिकारी व संबंधीत कंपनीच्या विरोधात कुडाळ न्यायालयात कचरा प्रकरणी खाजगी फिर्याद दाखल….

कुडाळ नगरपंचायतच्या अधिकारी व संबंधीत कंपनीच्या विरोधात कुडाळ न्यायालयात कचरा प्रकरणी खाजगी फिर्याद दाखल….

केसची पुढील तारीख 29 आॅक्टोबर 2026 रोजी….

कुडाळ :-

नारायण वसंत राऊळ व अनिल मंगेश साखळकर यांच्या जमीनीमध्ये त्यांच्या संमत्तीन श्री. खंडू लक्ष्मण पवळ, श्री. विलास मायाजी मुणगेकर, श्रीम. रसिका हर्षल नाडकर्णी, क्विनटेझ फॅसीलीटी मॅनेजमेंट इंडीया प्रा.ली. तर्फे संचालक श्री. निखील अरुण वलतुरे, स्वप्नील रजनीकांत गडेकर, श्री. अरुण दत्तात्रय वलतुरे हे कुडाळ शहर नगरपंचायत हददीमधील सुका तसेच ओला कचरा कोणत्याही स्वरुपाचे विघटन न करता व प्रक्रिया न करता खुल्या जागेत कचरा टाकीत आहेत. सदरचा कचरा टाकताना आरोपी क्रमांक 1 ते 8 यांना त्यांना पुर्णतः जाणीव होती की, अश्याप्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याने कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य किंवा जीव घेण्यासारखा आजारा होऊ शकतो, आरोग्यास घातक ठरणारी बाब आहे. तसेच सार्वजनीक उपद्रव होण्यासारखे आहे. असे असताही त्यांनी वरील सर्व बाबी कडे दुर्लक्ष करून अश्यास्वरूपाचे कचरा विल्हेवाट लावण्याचे काम केलेलेआहे.
सदरच्या कृत्यामुळे आजूबाजूच्या रहीवाश्यांना दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. तसेच त्याचा सार्वजनीक आरोग्यावर परिणाम होत आहे.त्याचप्रमाणे अश्या कचऱ्याच्या उकीरडयावर जगणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या रहीवाश्यांना होत आहे.. सबब ग्रामस्थांनी अनेकवेळा नगरपंचायत कुडाळ यांच्या कडे सदरचा कचरा डेपो बंद करण्यात यावा याबाबत निवेदन दिले. नगरपंचायतीने सदरचा कचरा डेपो हा बंद करण्यात येईल असे ग्रामस्थांना तोंडी आश्वासने दिली. परंतू कचरा बंद करण्याच्या दृष्टीने कोणतीही पाऊले उचलली नाही.नगरपंचायतीकडे घनकचरा व्यवस्थापनाचा निधी आहे. शासनाने त्यांना जागा सुध्दा उपलब्ध करून दिलेली आहे. असे असताही निष्काळजीपणाने वर नमूद आरोपी हे सांगीर्डेवाडी कुडाळ येथे कचरा टाकीत आहेत. सरतेशेवटी कुडाळ पिंगुळी येथील रॉयल पाम, पिंगुळी शिक्षक कॉलनी, उदयमनगर कुडाळ, सांगीर्डेवाडी, शेटकरवाडी, गुढीपुर येथील नागरीक यांनी दिनांक 05/10/2026 रोजी वरंडेश्वर मंदीर येथे सभा घेतली .
व कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे काही ग्रामस्थांनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, नगरपंचायत कुडाळ व मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कुडाळ यांना निवेदन वजा तक्रार दिली.
परंतू दोन्ही शासकीय विभागकडून सदर बाबी बाबत कोणतीही कारवाई केली नाही.
ग्रामस्थांनी काही काळा करीता स्वतःहुन कचरा डेपो बंद पाडला. त्यानंतर मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, नगरपंचायत कुडाळ यांनी मा. तहसिलदार, कुडाळ यांना पत्र देवून जमीन मालक यांना कचरा डेपोकरीता जागा देण्याबाबत आदेश करण्यात यावा
विनंती केली.
त्यांच्या विनतीप्रमाणे मा. तहसिलदार, कुडाळ यांनी आरोपी नारायण राऊळ व अनिल मंगेश साखळकर यांना जागा कचरा डेपो करिता उपलब्ध करून देण्यात यावी असा आदेश काढला.
त्याप्रमाणे नारायण वसंत राऊळ याने दोन महीन्याकरीता कचरा डेपोसाठी त्याची जागा उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याचे दिनांक 06/10/2026 रोजी पत्र नगरपंचायतीला दिले.
सदरचा कचरा डेपो हा भरवस्तीत आहे. असे असताही निष्काळजीपणाने व सार्वजनीक आरोग्याचे कोणते ही नियम न पाळता उघडयावर सदर आरोपी हे एकमेकांचे संगनमताने क्षणिक लाभापोटी कचरा डेपो करीत आहेत.
सदरचे कृत्य हे दखलपात्र गुन्ह्याचे स्वरूपाचे असून सुध्दा कुडाळ पोलीसांनी त्यांची कोणतीही दखल घेतली नाही.
सबब त्यांचे विरुध्द फिर्यादी याने मे. कुडाळ फौजदारी न्यायालयात भारतीय न्याय सहिता कलम 270,271,272,280
( Case Number: Cri.M.A./0000069/2026) प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल करून सर्व आरोपी विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. केसची पुढील तारीख 29/10/2026 मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा