*जागतिक साकव्य विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*नारी नव्हे नारायणी*
स्त्रीचा आत्मविश्वास जागा झाला. घराबाहेर पडत ती अर्थार्जन करू लागली. गाव सोडुन शहरात गेली. दाही दिशा तिच्यासाठी आव्हान देणार्या कळल्या.
पतिव्रता तर ती होतीच, कुटूंबवत्सल ही होती. जबाबदारीने संकटांशी लढणारी होतीच… पण आता तिच्यासाठी मोजता येणार नाहीत इतकी क्षेत्रे खुली झाली.
परदेशात जाऊन ती डॉक्टर होणारी आनंदी जोशी झाली, घोड्यावरून लढणारी अहिल्याबाई ताराबाई झाली,
साहित्य गंगेत ती आदर्श अशी शामची आई झाली.
गडकरींच्या एकच प्यालातली मुळू मुळू रडणारी, हरणारी सिंधू कूठेच नाहीशी झाली. प्रसंगी पतीला जाब विचारणारी रणरागिणी झाली.
राजकारणात पंतप्रधान इंदिरा गांधी, संसदपटू सुषमा स्वराज, जनतेसाठी लढणारी मृणाल गोरे, आज निर्मला सीतारामन अशा अनेक दिल्ली मुंब ई गर्जुन गेल्या.
अंतराळात कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, धोका पत्करूनही पण विजयी झाल्या. लेखिका, कवयत्री, संशोधक डॉक्टर्स इंजिनियर सी. ए.
चित्रकार मुर्तीकार, समाज सेवीका, अशा सर्व क्षेत्रात किर्ती मिळवत राहिल्या.
सिनेमात स्त्रीयांनी येऊ नये म्हणताना आज सिनेमा नाटक जाहिरात स्त्रीशिवाय चालतच नाहीत.
सागर संशोधन ,बांधकाम रेल्वे विज्ञान, जीवशास्त्र अशा अनेक आश्चर्य वाटेल अशा ठिकाणी तर त्या आहेतच पण दक्षिण ध्रृवावर पण कार्य करत आहेत.
हे तिचे कर्तृत्व तर मुग्ध करतेच पण ..
तरीही तिला विवाहसंस्था, मातृत्व, कुटूंब, नातेसंबंध, समाजाशी बांधिलकी, चारित्र्य या सर्वांची विश्वासपूर्वक जाणिव आहे. हे सारे तिला आजही हवेहवेसे आहे.
कार्यात ती दक्ष आहे, कूटूंबात ती जागरूक आहे, नात्यात जिव्हाळा जोडुन आहे, मैत्रीणीत मित्रात मोकळी हंसरी निरपेक्ष आहे.
मुलांशी दूरदृष्टी ठेऊन मायेत गुंतलेली आहे.
माहेरच्या लाड कौतुकाची तिला हौस आहे.
फिरायची सौंदर्याचा स्वाद घ्यायची आवड आहे.
जे आयुष्य आहे ते जबाबदारी व कर्तव्य न टाळता. आनंदात मौज घेत जगायला ती शिकली आहे. स्वत:चे निर्णय घेणे तिला जमते.
कोणी ऊगाचच सलगी करून आपला स्त्रीत्वाचा फायदा घेतोय असं वाटलं तर ती त्याला भिडते. अद्दल घडवते.
आपला मान सन्मान आपण सांभाळू शकते.
हे असं तिचं कर्तृत्व जरी वाखाणण्या सारखं असलं तरी चांगले तिथे वाईट असतंच. त्याला कळी म्हणतात.
हा कळी कानात शिरल्यावर कैकयी, मंथरा, आनंदीबाई अशा दुष्टपणा पण गाजवतात. मात्र इतिहासाने त्यांचा गौरव केलेला नाही.
तशा अपवाद म्हणुन ऊशीरा लग्न करणे, लग्न नकोच म्हणणे, मुलं नको असणे, विवाह पूर्व व विवाहबाह्य संबंध आवडणे कुटूंबात मोठी माणसे नको असणे , स्वैराचार भ्रष्टाचार आवडणे अशा कानात कळी शिरलेल्या पण अगदी कमी प्रमाणात स्त्रिया आहेतच की.
पण त्यांना मान सन्मान समाज देत नाही.त्या शेवटी एकट्या पडतात.
अशी शब्द ‘नारी’एकच पण जगाला भारी ठरला.
एकल्याच या शक्तीने अनंत रूपे ठाई ठाई दाखवली.
पण तरीही स्त्री ही ‘आई’या एका शब्दातच एकवटली…. गुंतली,… गौरवली गेली.. आणि आनंदी झाली.
तिची रणचंडिका, झुंझार, रौद्र, शृंगार, अभ्यासु या सर्व रूपांपेक्षा ती आईच्या ‘वत्सल’रूपात जगन्माता. जगदंबा दिसली.
साक्षात स्त्रीशक्ती… पार्वतीचेच रूप म्हणुन दिसली.
अनुराधा जोशी.
अंधेरी, मुं. 69
9820023605
