You are currently viewing फोंडाघाट एसबीआयमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापारी मेळावा उत्साहात

फोंडाघाट एसबीआयमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापारी मेळावा उत्साहात

फोंडाघाट एसबीआयमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापारी मेळावा उत्साहात

यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड व शैक्षणिक कर्जाबाबत मार्गदर्शन; व्यापाऱ्यांनी विचारले विविध प्रश्न

फोंडाघाट :

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाखा व्यवस्थापक श्रेयस लोहिया यांनी यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड तसेच शैक्षणिक कर्जासंदर्भात उपस्थित व्यापाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
डिजिटल बँकिंगचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याचे उपाय आणि बँकेच्या विविध सेवांचा सुरक्षितपणे लाभ कसा घ्यावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी विविध प्रश्न विचारून बँक अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
या मेळाव्याला अजित नाडकर्णी, राजू पटेल, सावंत पेट्रोल पंपचे व्यवस्थापक प्रसाद वालावलकर, जोईल सर, भोगले तसेच श्री. खाचणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. खाचणे यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी अजित नाडकर्णी आणि राजू पटेल यांनी बँकेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच यापूर्वीचे शाखा व्यवस्थापक पप्पू गुप्ता यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
एसबीआय शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शाखा व्यवस्थापक श्रेयस लोहिया यांनी उपस्थित सर्व व्यापारी व मान्यवरांचे आभार मानले. एकूणच हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा