You are currently viewing नमन करतात रसिक चार

नमन करतात रसिक चार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नमन करतात रसिक चार*

 

मिठा पिठाचा मागून जोगवा

फिरून आलीस *चार घरी*

अर्पण करून लक्ष्मी विष्णूला

समाधान विसावले मुखावरी

//1//

वाचूनी सर्व *पुराण कथा*

सांगड घालतेस व्यवहारी

न्याहारीला करून चारोळी

कविता लिहितेस तू भारी

//2//

कलाकुसरीत तू पारंगत

दारात काढतेस *रांगोळी*

कौतुक करतो पै पाहुणा

रोज सूर्याची किरणे निळी

//3//

कोण धरणार हात तुझा

हाती असे सदैव लेखणी

गेलीस बाहेर जरी कुठे

न्यून शोधते दृष्टी देखणी

//4//

कात्यायनीचा तू अवतार

विहार करतेस *गंगेपार*

मोगरा गजरा असा माळतेस

नमन करतात रसिक चार

//5//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

1610/932434157

प्रतिक्रिया व्यक्त करा