ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या तीन रक्तदात्यांनी वाचविले रुग्णाचे प्राण
कुडाळ
एस एस पी एम हॉस्पिटल येथे ऍडमिट असलेल्या रत्नाकर राऊळ या पेशंटकरिता बायपास शस्त्रक्रियेच्या वेळी दुर्मिळ अशा ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या चार युनिट्स रक्ताची आवश्यकता होती. त्यावेळी आमच्या ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते प्रसाद निर्गुण, अभय भिडे व मदन कुडाळकर यांनी आज एस एस पी एम हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये जाऊन अमूल्य असे रक्तदान केले.
एकाच वेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या तीन ऑन कॉल रक्तदात्यांनी या रुग्णासाठी बहुमोल असे रक्तदान करून त्या रुग्णाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. या रक्तदात्यांच्या या असीम कार्याबद्दल ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक दयानंदजी गवस सर यांनी या सर्वांचे विशेष कौतुक केले आहे.
आमच्या ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या इतर अनेक ऑन कॉल रक्तदात्यांप्रमाणे या तीनही रक्तदात्यांच्या सत्कार्याचासुद्धा संस्थेला सार्थ अभिमान आहे. सर्वांच्या या दैवी दातृत्वाला शतशः प्रणाम.
