You are currently viewing जे काही जगायचं ते आजचं जगून घ्यायचं

जे काही जगायचं ते आजचं जगून घ्यायचं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*“जे काही जगायचं ते आजचं जगून घ्यायचं”*

 

काल परवा विविध कार्यक्रमत दिसणारे.सर्वांसोबत असणारे एक हरहुन्नरी कलाकार अभिनयातलं पात्र खऱ्याअर्थाने जगणारे किंबहुना जिवंत करणारे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व एक खूप चांगला माणूस आदरणीय कै नाना पाटेकर आज या जगात नाही……

तेव्हा…..

आयुष्याचा काहीच भरवसा नाही. कधी कोणता क्षण अखेरचा ठरेल, हे कुणालाच माहीत नसते. म्हणून सारे राग-रुसवे, भांडणं आणि दुरावा विसरून आपल्यांसोबत प्रेमाने जगणे,हाच खरा सुखाचा आनंदाचा मार्ग आहे.

कधी कधी काय होतं की मनातील वेदना दाबून ठेवल्याने जी घुसमट निर्माण होते,ती हळूहळू माणसाला आतून पोखरून काढते आणि एक दिवस सगळंच उद्ध्वस्त करून टाकते. म्हणून….

आपल्या आयुष्यात रोज येणारा प्रत्येक क्षण जगायला हवा आपल्याला जे वाटत तथा जे अपेक्षित आहे ते करा त्या वेळेचा आनंद घ्या.जीवन हे खरच क्षणभंगुर आहे.एक सेकंद सुद्धा लागत नाही हो आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या माणसाला आपल्यातून जायला.राग रूसवा अहंकार आणि दुरावा बाजूला ठेवून आपल्या माणसांना माफ करायला शिका.वेळ असतानाच त्यांच्यासोबत राहा, कारण गेलेला वेळ आणि निघून गेलेली माणसं पुन्हा परत येत नाहीत.आज जगा उद्याच्या भरोशावर राहु नका.आपण आजच जगणं उद्यावर सोडून देतो.पण उद्या कधीच येत नाही.म्हणून आज काय जगायचं आहे ते जगून घ्यायचं आनंदालाही आनंद वाटेल अशा आनंदी क्षणाचा आनंद घेऊन आजच जगा कशाला उद्याची वाट बघायची. हे आयुष्य खूप छोटं आहे.आपल्या माणसांच्या प्रेमात,आपलेपणात आणि हास्याच्या सोबतीने जगण्यातच खरे जीवन सामावलेले आहे.

रोज तेच तेच जगण्यापेक्षा आपल्या जगण्यात काहीतरी नावीन्य आणा घर संसार कुटूंब परिवार समाज हे तर असणारच आहे पण याहुनही काही वेगळेपण असतं माणसाच्या आयुष्यात त्या वेगळेपणाचा आनंद घेता आला पाहिजे. आपल्यात काही सुखद आनंद असतो त्याचा आनंद आयुष्यात घेत नाही. त्या अनपेक्षित सुखद आनंदाचा अनुभवही घेता आला पाहिजे किंबहुना घ्यायलाच हवा. म्हणजे हे जग सोडण्या आधी काही करायचं राहुन गेलं याचा पश्चात्ताप व्हायला नको.काही माणसं फक्त पैसा या एकाच विचारत जगतात आणि आपल्या स़ोबत असणाऱ्या आनंदाला मुकतात.पैसा तर कमवायचाच पण त्यांच्या मागे धावून आपण आपल‌ जगण विसरून जातो गरजेपेक्षा जास्त पैसा मिळवला की आपल्याला काहीच करता येत नाही त्या पेक्षा गरजेपुरता कमवा उगाच पैसे कमावण्याच्या नादात धावपळ करून आपणं आपलं जगणं सोडून देतो.सुख आपल्या जवळ असतं पण कधी कधी ते घेत नाही खरंतर सुख शोधण्याची गरज यायलाच नको.आता फक्त आयुष्यात आनंद राहीला आहे.पण या धकाधकीच्या जीवनात माणसं फक्त श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहेत. मग सरते शेवटी आपल्या जगण्याच्या हिशोब मा़ंडतात तेव्हा कळतं आपल्या आयुष्यातून सुख आनंद कधीचं निघून गेला असतो.मग तेव्हा विचार करतो की हे करायचं राहुन गेलं ते करायचं राहुन गेलं. म्हणून जे आहे जसे आहे तसंच जगता जगता त्या जगण्यातून त्या धावपळीतून जरासं बाजूला होवून त्यापेक्षा निराळे जगण्याच्या आनंद काही निराळ वेगळं करण्याचा अनुभव माणसाला एक नवीन उर्जा देत असतं.अशा वेगळेपणाचा अनुभव घेताना किंवा जगताना माणसाची सगळी मरगळ निघून जाते.आणि पुन्हा नव्याने जगण्यासाठी नवचैतन्य निर्माण होते तेव्हा माणूस पुन्हा नव्याने पाळायला लागतो.म्हणून सगळ्या अनुभवातून जावून सुखासुखीचा आनंद घेता घेतांना आयुष्या मस्त मजेत जंगल पाहिजे.सरते शेवटी माणसाची राख होणार असते. म्हणून काय जगायचं आहे ते आजचं जगून घ्यायचं उद्या कोणी पाहिला खरंतर माणसाच्या आयुष्यात उद्या कधीचं येत नाही म्हणून आजच जगायचं असतं.ते जगता आलं पाहिजे.

कशाला चिंता चिडचिड करायची समस्या ह्या असणारच आहेत त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत मग त्याच्यासाठी काय आनंदाचे क्षण सोडून द्यायचे का?आज खायला भेटलं ना मग काय.आज पोटात दोन घास गेलेत याचा सारखा आनंद दुसरा नाहीच. अणि मुळात नसतोच.जगण्याच समाधान वाटलं पाहिजे हो आजच्या जगण्याच समाधान वाटलं की नंतरचे येणारे सर्व दिवस आनंदाचे असतात आजचा दिवस सुखात,आनंदात,छान,मजेत गेला ना की उद्याची पहाट एक नवीन संधी घेऊन येत असते.

खूप काही लिहीता येईल वाचता येईल.पण लिहलेले वाचलेलं आत्मसात केलं की मग तेव्हा जगणं कळतं. जेव्हा जगणं कळायला लागलं की तेव्हा आयुष्याला आनंदाला सुरवात होते त्या सुरवातीचा शेवट जर आजच केला तर मग उद्याच्या जगण्यात मजा येत नाही.म्हणून जे काही जगायचं आहे ते आजचं जगून घ्यायचं उद्या जगणं असेल की नाही माहिती नाही.

शेवटी एवढंच…

माणसं जपायला शिका, नाती जपायला शिका आणि प्रेम व्यक्त करायला शिका. कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही! आपल्यातून गेलेला माणूस परत कधीच… खरचं सांगतो….कधीच….परत येत नाही.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा