बेंगलोर कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या परवीन कौसर यांनी चौथ्या माळेत उलगडले शैक्षणिक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे विविध पैलू
बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील मराठी विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम् १५०’ अंतर्गत आयोजित ‘वंदे मातरम् महिला अपूर्वम्’ या उपक्रमांतर्गत ‘शारदीय व्याख्यानमाला २०२६’ चे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले. ‘नवदुर्गा : नवविचार’ या व्याख्यानमालेची चौथी माळ बेंगलोर कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक
परवीन कौसर यांनी वाहिली.
या निमित्ताने ‘शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे योगदान’ या विषयावर सन्माननीय परवीन कौसर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांचा संघर्ष, कर्तृत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांवर प्रकाश टाकला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देत त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हे व्यक्तीच्या आणि समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, ज्ञानाच्या सामर्थ्यातून सामाजिक परिवर्तन घडवता येते, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला. त्यांनी आपल्या अम्मीने आणि त्यांच्या शिक्षिका श्रीमती फरीदा बेगम मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचा धावता आढावा घेतला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली या
व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विश्वभान प्रतिष्ठान संस्थेचे सौजन्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी केले तर सी.ए डॉ.सीमा शाह यांनी महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. सहाय्यक प्रा. माधवी पवार यांनी उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वाती परब हिने महालक्ष्मी स्तोत्र सादर करून वातावरण मंगलमय केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
_________________________
*संवाद मीडिया*
*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*
🔸 *कोर्सचे नांव-
💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612
*📞 संपर्क:*
*9960906947 / 9422620047*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
