You are currently viewing काही बंध असेही

काही बंध असेही

ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना

*काही बंध असेही*

बंध असेही
काही मनाला बांधतात
भावना गुंततात
त्यात…..

मातृत्वाची भावना
असती वात्सल्याचे बंध
रक्ताचे संबंध
अतूट….

जिवाभावाची नाती
जोडतात कोणी तोडतात
मने दुभंगतात
त्यामुळे….

मैत्रीचे अनुबंध
देतात जीवाला आधार
टाकायचा भार
खुशाल….

काही बंध
पाहिले ना देखिले
आपले मानले
सख्ख्याप्रमाणे….

आत्म्याचा परमात्म्याशी
अतूट असतो बंध
जन्मोजन्मीचा संबंध
अनन्य….‌‌!!

०००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा