सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या सिया गावडेचे क्रीडा स्पर्धेत यश*
वेंगुर्ले
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सिया भरत गावडे हिने थाळीफेक या क्रीडाप्रकारात 14 वर्षांखालील मुली या गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिया ने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव दत्तात्रय परुळेकर,संचालक प्रशांत नेरुरकर,शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
