You are currently viewing पांढरी काठी दिनानिमित्त सावंतवाडीत दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा

पांढरी काठी दिनानिमित्त सावंतवाडीत दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा

पांढरी काठी दिनानिमित्त सावंतवाडीत दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा

१५ ऑक्टोबर रोजी NAB नेत्र रुग्णालयात आयोजन; गरजू लाभार्थ्यांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप

सावंतवाडी

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या वतीने दृष्टीबाधित लाभार्थ्यांसाठी गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता भटवाडी, सावंतवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर होणार आहे.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व सैनिक पतसंस्थेचे प्रमुख श्री. सुनील राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुडाळ येथील रो. प्रणय तेली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या स्नेहमेळाव्यात गरज असलेल्या दृष्टीबाधित लाभार्थ्यांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांसाठी चहा-पाणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दृष्टीबाधित व्यक्तींना एकत्र आणणे, त्यांच्याशी स्नेहसंवाद साधणे आणि त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला सर्व दृष्टीबाधित लाभार्थ्यांनी तसेच रोटरी, इनरव्हील, लायन्स क्लबचे सदस्य, बंधू-भगिनी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन NAB सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर आणि सचिव श्री. सोमनाथ जिनी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा