You are currently viewing महिषासुरमर्दिनी
Oplus_16908288

महिषासुरमर्दिनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*महिषासुरमर्दिनी*

 

मातला दानव पुत्र महिषी-रंभासुराचा

महिष-मानव संयुक्त त्याची काया

बहु तपाचरणे ब्रह्मदेवासी केले प्रसन्न

जाणतसे रुप बदलण्याची अजब माया…

 

मूळातच बलदंड वरदाने वाढले बल

त्रिभुवनी हक्क गाजवी,नागविले सुर

मृत्युचे भय नुरले,अमरची झाला जणू

स्त्री अबला मानुनी निर्भय होई असुर…

 

आळविले मग देवगणांनी सुरेश-महेश

देवतेजातून निर्माण झाली दिव्यशक्ती

मुख्यत्वे मुख-हस्त-नेत्र,त्रिमूर्तींची कृपा

प्रकटली तेजस्वी दुर्गामाता आदिशक्ती…

 

देवीच्या हाती तळपली दैवी आयुधे

त्रिशूळ,चक्र,भाला,वज्र आणि कित्येक

कमाल करी विविधरुपात लढे दैत्य

सिंहारुढेचा वरचढ ठरे प्रतिवार प्रत्येक…

 

नऊ दिवस जाहले अतीभीषण युद्ध

उग्ररुप भयकारी वाटले राक्षसास

कळले आला त्रिशूळ बनूनी काळ

वधिले दशमीस, हर्षविले त्रिभुवनास…

 

जय अंबे… जय दुर्गे…

जय जय महिषासुरमर्दिनी…

 

विजया केळकर ______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा