You are currently viewing सावंतवाडीत १५ ऑक्टोबरला ‘पांढरी काठी दिवस’

सावंतवाडीत १५ ऑक्टोबरला ‘पांढरी काठी दिवस’

सावंतवाडीत १५ ऑक्टोबरला ‘पांढरी काठी दिवस’

NAB नेत्र रुग्णालयात स्नेहमेळावा; गरजू दृष्टिबाधितांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप व मोफत नेत्रतपासणी

सावंतवाडी

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘पांढरी काठी दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील भटवाडी परिसरातील NAB नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात गरजू दृष्टिबाधित व्यक्तींना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच गरजू व्यक्तींची विनामूल्य नेत्रतपासणी केली जाणार आहे. NAB च्या दृष्टिबाधित लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी व परत जाण्यासाठी प्रवासखर्च देण्यात येणार असून, उपस्थितांसाठी चहा-पाणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्नेहमेळाव्याला शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दृष्टिबाधित व्यक्तींना आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला NAB च्या सर्व दृष्टिबाधित लाभार्थ्यांनी तसेच गरजू व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर आणि सचिव सोमनाथ जिनी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा