You are currently viewing भटवाडीत दुर्गामातेचे वाजत-गाजत आगमन!

भटवाडीत दुर्गामातेचे वाजत-गाजत आगमन!

भटवाडीत दुर्गामातेचे वाजत-गाजत आगमन!

ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर; जयघोषाने परिसर दुमदुमला

सावंतवाडी

येथील भटवाडीच्या ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या श्री दुर्गामातेचे आज उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात भव्य मिरवणुकीने आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर आणि ‘दुर्गा माता की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, दिलीप भालेकर, शिवम सावंत, रघुनाथ धारणकर, भार्गव धारणकर, राजा दळवी, प्रसाद परब, दीपक सावंत, प्रदीप भालेकर, रमेश परब, चंदन नाईक, कुणाल शृंगारे, विजय सावंत, गौरव रामाने, स्वप्निल कमते, तानाजी पाटील, जय भालेकर, दत्तगुरु मोर्ये, संतोष खंदारे, सुनील जाधव आणि अभय खंदारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा