You are currently viewing बांदा उड्डाणपुलाला ‘संत सोहीरोबानाथ आंबिये उड्डाणपूल’ नामकरण करा

बांदा उड्डाणपुलाला ‘संत सोहीरोबानाथ आंबिये उड्डाणपूल’ नामकरण करा

बांदा उड्डाणपुलाला ‘संत सोहीरोबानाथ आंबिये उड्डाणपूल’ नामकरण करा

*बांदा ग्रामस्थांची राष्ट्रीय महामार्गकडे मागणी*

बांदा :

बांदा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला कोकणातील थोर संत, कवी व साहित्यिक संत सोहीरोबानाथ आंबिये यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

बांदा परिसराला मोठी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा लाभली असून, संत सोहीरोबानाथ आंबिये यांच्या पवित्र पदस्पर्शाने आणि विचारांनी ही भूमी पावन झाली आहे. बांदा हे संत सोहीरोबानाथ आंबिये यांच्या कार्यभूमीशी जोडलेले असून, त्यांच्या साहित्यिक व आध्यात्मिक योगदानाच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात यासाठी उड्डाणपुलाला ‘संत सोहीरोबानाथ आंबिये उड्डाणपूल’ असे नामकरण करावे, अशी मागणी बांदा ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख राजेश विरनोडकर, बांदा तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, गांधीचौक नवरात्र मंडळ अध्यक्ष दर्पण आळवे, सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, व्यावसायिक विनोद सावळ आदी उपस्थित होते.

संत सोहीरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यिक आणि आध्यात्मिक कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला उचित सन्मान मिळावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, संबंधित प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा