“दिव्यांग बांधवांची धार्मिक सहल उत्साहात संपन्न”
“विशालजी परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; ४० दिव्यांग बांधवांचा सहभाग”
*सिंधुदुर्ग ते अक्कलकोट:*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गआणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग चे युवा ने ते मा. श्री विशालजी परब साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने
“दिव्यांग बांधवांची धार्मिक सहल दि. ६, ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ”
“उत्साहात पार पडली. या सहलीत एकूण ४० दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. “सहलीची सुरुवात कसाल येथील साईकृपा संस्थेच्या कार्यालयासमोरून करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष मा श्री. प्रभाकर जी सावंत साहेब उपाध्यक्ष मा. श्री प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई साहेब, भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते मा. श्री. राजु राऊत साहेब उपस्थित होते. तसेच संस्थाध्यक्ष श्रीअनिल शिंगाडे सर व सुनील तांबे, प्रशांत कदम, सुनिल कांबळी, दिक्षा तेली, शामसुंदर लोट, बाबुराव गावडे, सविता गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर या सहलीला मा. श्री. शिवाजी घोगळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले ठरवलेल्या नियोजनानुसार
“अक्कलकोट, पंढरपूर, नर्सोबाची वाडी ,आदमापूर, बाळूमामा येथील मंदिराला भेट देण्यात आली. ”
“दिव्यांग बांधवांनी अंताक्षरी, विविध खेळ तसेच चंद्रभागेत स्नान करून आनंद लुटला.”त्यामुळे सहलीचे वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले. “या सहलीचे नियोजन व नेतृत्व संस्थाध्यक्ष श्रीअनिल शिंगाडे यांनी केले होते. ”
“माननीय विशालजी परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांची सहल आयोजित केली होती.”
या सहलीसाठी संस्थाध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांनी विशालजी परब साहेब यांना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन ”
“माननीय विशालजी परब यांनी दिव्यांग बांधवांची सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.”,
“दामले ट्रॅव्हल चे मालक माननीय दामले यांनी निवास, भोजन, नाश्ता तसेच वाहनाची उत्कृष्ट व्यवस्था ”
“केल्यामुळे दिव्यांग बांधवांचा प्रवास सुखकर झाला.”,
“दिव्यांग बांधवांच्या वतीने माननीय विशालजी परब, माननीय बाळू देसाई, माननीय प्रसन्ना देसाई ”
“आणि माननीय दादा मले यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संस्थाध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांनीही ”
“सर्व सहकार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले व आनंद व्यक्त केला.
