You are currently viewing हरिनाम सप्ताहाची सांगता; श्री राधाकृष्ण मंदिरातून निघाली पालखी

हरिनाम सप्ताहाची सांगता; श्री राधाकृष्ण मंदिरातून निघाली पालखी

हरिनाम सप्ताहाची सांगता; श्री राधाकृष्ण मंदिरातून निघाली पालखी

गावप्रदक्षिणेनंतर श्री मारुती मंदिरात भेट; आठ दिवसांच्या सप्ताहानंतर भाविकांनी घेतला भक्तिमय सोहळ्याचा आनंद

फोंडाघाट :

श्री राधाकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी रात्री भक्तिमय वातावरणात झाली. सप्ताहाची रात्र संपल्यानंतर बालगोपाळांच्या सहभागातून श्री राधाकृष्ण मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीने संपूर्ण गावाची प्रदक्षिणा पूर्ण करत श्री मारुती मंदिरात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पालखी पुन्हा श्री राधाकृष्ण मंदिरात आणण्यात आली.
या पालखी सोहळ्याची ग्रामस्थ व भाविक आतुरतेने वाट पाहत होते. ‘मार्गे हळूहळू चाला, मुखाने श्री राधाकृष्ण बोला’च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या पायांवर पाणी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आठ दिवसांच्या हरिनाम सप्ताहातील परिश्रमानंतर सांगतेच्या रात्री सर्व भाविकांना उसळ आणि पावचा प्रसाद देण्यात आला. या सोहळ्याला ग्रामस्थ, भाविक आणि बालगोपाळांची मोठी उपस्थिती होती.
श्री राधाकृष्ण महाराज की जय! 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा