You are currently viewing आंबेरीत ११ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

आंबेरीत ११ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

आंबेरीत ११ ऑक्टोबरला भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

भाजपा मालवण तालुका व उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मोफत औषध वाटप

मालवण । 
भाजपा मालवण तालुका आणि तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आंबेरी येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिराचा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात त्वचारोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व बालरोग तसेच अस्थिरोग तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे.

यासोबतच नागरिकांची मोफत शुगर व रक्तदाब तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक रुग्णांना मोफत औषधांचे वाटप केले जाणार आहे. डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूविषयी मार्गदर्शन, सांधेदुखी, गुडघेदुखी व कंबरदुखी याबाबतही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला दिला जाणार आहे.

‘आरोग्यदायी समाज, समृद्ध मालवण, सेवा संकल्प अभियान, विकसित भारत’ हा संकल्प घेऊन आयोजित या शिबिराचा आंबेरी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा मालवण तालुका आणि उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा