You are currently viewing फोंडाघाट हायस्कूलच्या दिंडीने भक्तीमय वातावरण

फोंडाघाट हायस्कूलच्या दिंडीने भक्तीमय वातावरण

फोंडाघाट हायस्कूलच्या दिंडीने भक्तीमय वातावरण

राधाकृष्ण मंदिरातील हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस उत्साहात; महिला ढोलपथक ठरले आकर्षण

फोंडाघाट :

श्री. राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी फोंडाघाट हायस्कूलतर्फे भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत राक्षस, कृष्ण, राधा-गोपी नृत्य, लेझीम, वारकरी, एनसीसी पथक यांसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिंडीतील महिला ढोलपथक हे विशेष आकर्षण ठरले. भक्तीमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. यापूर्वी भाजीपाला मित्रमंडळातर्फे आयोजित हळदीवेळी अघोरी नृत्य आणि त्यानंतर हायस्कूलच्या दिंडीमुळे सलग दोन दिवस भाविकांचे मनोरंजन झाले.
हरिनाम सप्ताहाचा आज सांगता दिवस असून बळ गोपाळ मंडळातर्फे रंगीत-संगीत दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री डबल बारीचा कार्यक्रम होणार आहे. याचबरोबर श्री. मारुती मंदिर येथे एक दिवसीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सात दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी माहेरवाशिनींसह भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत असून संपूर्ण फोंडाघाट परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा