You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे रायफल शूटिंग स्पर्धेत यश

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे रायफल शूटिंग स्पर्धेत यश

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन चे रायफल शूटिंग स्पर्धेत यश

वेंगुर्ले

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित जिल्हा स्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पार पडली.या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी वरद विश्वनाथ जगताप याने पीप साइट या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच त्याची 15 ऑक्टोबर रोजी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वरद ने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव दत्तात्रय परुळेकर,संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा