You are currently viewing सावंतवाडी उभा बाजार येथे महा आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सावंतवाडी उभा बाजार येथे महा आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सावंतवाडी उभा बाजार येथे महा आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सावंतवाडी

हनुमान मित्र मंडळ, उभा बाजार, अपना दवाखाना (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे) व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी 4 वाजता उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात महा आरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, सौ. सायली दुभाषी, सौ. स्नेहा नाईक, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, अपना दवाखान्याचे डॉ. हर्ष साळगावकर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, बाबल्या दुभाषी, यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर, अरुण भिसे, बाळू कासार, हर्षल पोकळे, सचिन मळीक, कुंदन टोपले, ‌‌ हो ष ग कोरगावकर, कपिल कोरगावकर, परिचारिका तृप्ती अंधारी, गंगा सुतार, परिचर यशवंत परब, लॅब टेक्निशियन गायत्री वारंग गंगा सुतार परिचारिका व अनेक रुग्ण व नागरिक, महिला उपस्थित होते.

*या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन -*

*सौ. सुकन्या टोपले (अध्यक्षा, अपना दवाखाना) -* प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी स्वतःचे, आई-वडिलांचे व मुलांचे आरोग्य तपासून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील आजार रोखता येतील.

*सौ. सायली दुभाषी -* अपना दवाखाना मार्फत लिपीड प्रोफाईल, शुगर, ब्लड प्रेशर तपासणी व मोफत औषधे दिली जातात.

*डॉ. हर्ष साळगावकर -* अपना दवाखान्यात दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत (रविवार व सरकारी सुट्टी वगळता) दर दोन महिन्यांनी मोफत तपासणी व औषधे मिळतात.

*राजेंद्र (राजू) मसुरकर -* प्रत्येक कुटुंबाने पंतप्रधान आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे 5 लाखाचे कार्ड काढावे. 70 वर्षावरील ज्येष्ठांसाठी 10 लाखापर्यंतचे वयो वंदना कार्ड मिळते. देशात 2399 प्रकारच्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात मोफत होतात, याची जनजागृती गरजेची आहे. तसेच 40 वर्षांनंतर दर चार महिन्यांनी लिपीड प्रोफाईल तपासणी करावी, 220 पेक्षा जास्त कोलेस्टेरॉल असल्यास हृदयविकार व पॅरालिसिसचा धोका असतो. यासाठी योग्य ती तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्याकडून करून घेण्यात यावी

शिबिरात अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. आभार देऊन स्वागत हनुमान मित्र मंडळाच्या बाबल्या दुभाषी यांनी पदाधिकाऱ्यांनी मानले, तर स्वागत बाबल्या दुभाषी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा