You are currently viewing दोन ऑक्टोबर
Oplus_16908288

दोन ऑक्टोबर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दोन ऑक्टोबर*

 

मूठभर तर उचललं होतं मीठ त्यांनी

हादरवलं होतं त्या टीचभर देशाला

अंगभर कपडा ही नसतांना

उतरवला होता कपडा न कपडा त्यांच्या अंगाचा

 

ते आले होते अंगावर धावून

दांडकी होती त्यांच्या हाताला

दांडक्या सारखा हा देह बोलला

“चले जाव !” त्या गोऱ्यांना

 

हिंसेला उत्तर अहिंसेचे

अदभूत होते ते सर्वांना

डगमगला नाही परि तो

लाठ्या झेलूनी अंगाला

 

नव्हती शस्रे नव्हती शास्रे

उपोषण नि असहकाराची शस्रे दिली हाताला

विनयाने अविनया हरविण्या सविनय कायदेभंग

करण्याची शास्रे शिकविली आम्हांला

 

कोटी कोटी प्रणाम मानवा

कोटी कोटी नमन तुला

भारतभूवर उपकार तुझे हे

नतमस्तक आज मी तुझिया चरणाला

 

–राजा जोशी

9823687519

०२ ऑक्टोबर २०२६

〰️〰️〰️〰️〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा