You are currently viewing २३ ऑक्टोबरला होणाऱ्या महसूल लोक अदालतीचा लाभ घ्यावा   

२३ ऑक्टोबरला होणाऱ्या महसूल लोक अदालतीचा लाभ घ्यावा  

२३ ऑक्टोबरला होणाऱ्या महसूल लोक अदालतीचा लाभ घ्यावा

 सिंधुदुर्ग

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीने व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यात येणार आहे. संबंधित पक्षकारांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

 

            अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक अपील प्रकरणे, तसेच तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयातील प्रलंबित दाव्यांविरोधात दाखल द्वितीय अपील व रिव्हिजन अर्जांचा प्राधान्याने निपटारा करण्यात येणार आहे.

            शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अपर जिल्हाधिकारी यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            नागरिकांच्या सोयीसाठी अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या अपील प्रकरणांचा या महसूल लोक अदालतीमध्ये तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित हितसंबंधित, पक्षकार व अर्जदार यांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीने निपटाऱ्यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी विहित कालावधीत संपर्क साधून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा