You are currently viewing स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम

नवी सांगवी

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बेसिक्स टीम व बाबुरावजी घोलप माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन, पर्यावरण संवर्धनाची शपथ, पथनाट्य व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, बाराघोलप विद्यालयातील प्राचार्य, शिक्षक,आरोग्य मुकादम अरुण जगताप महानगरपालिका कर्मचारी वर्ग व बेसिक्स टीम, शाळेतील विद्यार्थी यांनी प्लॉगाथॉनमध्ये सहभागी होत परिसराची स्वच्छता केली .

या मोहिमेत सुमारे १५८ किलो कचरा व प्लास्टिक संकलित करण्यात आले. उपक्रमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा