You are currently viewing आई-वडिलांच्या स्मरणार्थ चंद्रहास उर्फ बबली राणेंकडून गोपुरी आश्रमाला आर्थिक मदत

आई-वडिलांच्या स्मरणार्थ चंद्रहास उर्फ बबली राणेंकडून गोपुरी आश्रमाला आर्थिक मदत

आई-वडिलांच्या स्मरणार्थ चंद्रहास उर्फ बबली राणेंकडून गोपुरी आश्रमाला आर्थिक मदत

गांधी जयंतीनिमित्त कै. आत्माराम बापू राणे व कै. अलका आत्माराम राणे यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपयांची देणगी

कणकवली :

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून कोकण गांधी कै. आप्पासाहेब पटवर्धन गोपुरी आश्रम येथे गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ गोपुरी आश्रमासाठी ५ हजार रुपयांची रोख देणगी आश्रमाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मुंबरकर यांच्याकडे सुपूर्द केली.
कै. आत्माराम बापू राणे व कै. अलका आत्माराम राणे यांच्या स्मरणार्थ ही मदत करण्यात आली. यावेळी उद्योजक विजय सावंत, संदीप सावंत, सौ. अर्पिता मुंबरकर, महानंदा चव्हाण, बाबू राणे यांच्यासह गांधी विचारांचे अनुयायी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी सांगितले की, “सन १९८५ पासून बालपणीच्या व शालेय जीवनापासून आजपर्यंत गोपुरी आश्रमाशी माझे स्नेहाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. याच भावनेतून आश्रमासाठी काहीतरी योगदान देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
गांधी विचारांचा वारसा जपणाऱ्या गोपुरी आश्रमाशी असलेले आपले जुने नाते जपत राणे यांनी केलेल्या या योगदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा