आमचे प्रिय मित्र राजु मसुरकर तथा राजुभाई यांचा आज वाढदिवस,,,,,,,,🎂💐
सावंतवाडी
हाडाचा समाजसेवक, आरोग्य सेवेसाठी आपले पुर्ण जीवन वाहून घेतलेला, अनाथाचा नाथ, नव्वद च्या दशकात सक्रिय राजकारणात दबदबा असलेले मोठ प्रस्थ म्हणजे राजु मसूरकर,,,,, पण राजकारणाचा झालेला ## बाजार पाहुन विटलेल्या राजु ने राजकारणातील वावर कमी करून समाजसेवा व आरोग्य सेवेचा वसा खांद्यावर घेतला, आणि आज गरिबांचा मसीहा म्हणुन समाजात अत्यंत लोकप्रिय असलेला हा अवलिया,,,,,,, स्वतःच्या खिशातुन रुग्ण सेवा करणारे आजच्या जगात सापडणे शक्य नाही,,,!! हे काम राजु गेली पंचवीस वर्षे प्रत्येक दिवशी करत असतो,,आरोग्य क्षेत्राशी संबंधित शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे काम राजू स्व खर्चाने नेहमीच करत असतो,,अनेक आरोग्य शिबिरा मार्फत मोठमोठे तज्ञ् डॉक्टर आणुन राजुने गोरगरिबांना चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ दिला आहे,,, जे काम आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमणार नाही ते काम राजु स्व खर्चाने कोणतीही अपेक्षा न ठेवता करत असतो,,,, रोज सकाळ संध्याकाळ राजु कॉटेज हॉस्पिटल मध्ये उपस्थित राहुन सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन असतो म्हणुनच कॉटेज हॉस्पिटल ची परिस्थिती त्यातल्या त्यात चांगली आहे हे मान्य करावेच लागेल,,,,,,!!!!
मितभाषी असलेला, सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सलोख्याचे असलेले संबंध हि राजु ची जमेची बाजु आहे,,,,मंत्रालय पातळी वरील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट फोन करून आरोग्य विषयक समस्या तात्काळ सोडवून घेण्यात राजु ची विशेष हातोटी आहे,, हे अनेकदा आम्ही अनुभवले असुन ,,, नुसते आरोग्य क्षेत्रच नव्हे तर कोणतेही सामाजिक काम,,कोणावरही कसलाही गंभीर प्रसंग किंवा अपघात झाल्यास सर्वात पाहिला हॉस्पिटल मध्ये पोचणारा राजु चं असतो,,,,,,,राजु बोलतो किंवा काम करतो ते अनेकांना अनेकदा रुचत व पटत नसत पण आरोग्य क्षेत्रात तन मन धन अर्पण करून निस्वार्थी पणे काम करणारा दुसरा माणुस मी तरी माझ्या आतापर्यंत च्या जीवनात पाहिला नाही,,,, माझ्या दृष्टीने खरा आरोग्यदुत हा राजुच आहे,,,,,!!!
अशा ह्या गोरगरिबांच्या कैवाऱ्याला परमेश्वरा ने दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य देऊन,गरीब रुग्णाची सेवा करण्याची शक्ती देवो, हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
प्रिय राजु ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐
शुभेच्छुक : संदिप कुडतरकर आणि परिवार,,
सावंतवाड,,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
