You are currently viewing हे जीवन सुंदर आहे…
Oplus_16908288

हे जीवन सुंदर आहे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हे जीवन सुंदर आहे….*

 

हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे

जशी भावना मनात तुमच्या,तसेच ते हो राहे..

हे जीवन सुंदर आहे..

 

दृष्टी ठेवा साफ आपुली

मनी नको हो पाप

नजरेमधले भाव आपुले

पहा पाडतील छाप..

घडे चांगले पहा नेहमी जर का मनात राहे..

हे जीवन सुंदर आहे…

 

पुष्पे उमलती वेली वरती

सदा किती हासती

निर्माल्यच हो होईल आता

जरी असे माहिती.

खंत न करती मुळी फुले ती क्षणभंगुर जरी ते आहे…

हे जीवन सुंदर आहे..

 

अवकाशातील पहा चांदण्या

चमचम किती त्या करती

आपणासाठी रोज येतसे

पहा सागरा भरती..

झाडे पाने फुले ही सारी बहर गळूनी जाये..

हे जीवन सुंदर आहे…

 

गेल्याची ना खंत असावी

स्वागत नव्याचे करुनी

फुलाफळांनी बहरून आहे

वसुंधरा ही अवनी…

सृष्टी निर्मिली आपल्यासाठी जाणीव मनी ती

वाहे…

हे जीवन सुंदर आहे..

हे जीवन सुंदर आहे..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा