You are currently viewing अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे

अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे

*सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांचे केलेले शब्दांकन*

 

*अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे* 

 

श्रीमती नयना गुंडे हया सध्या अमरावती विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा माझा परिचय गोंदियाला त्या जिल्हाधिकारी असताना पासूनचा आहे. एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर सनदी अधिकारी म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे.

 

त्या नाशिकला आदिवासी विभागाच्या आयुक्त असताना मी व ज्युनिअर आयएएस हा दुस-या वर्गापासून शालेय विद्यार्थ्यांना आय ए एस चे प्रशिक्षण विभाग सांभाळणारे लातूरचे संस्कार प्रकाशनाचे संचालक श्री ओमप्रकाश जाधव यांच्यासह त्यांना भेटलो होतो. अतिशय तत्परतेने निर्णय घेणाऱ्या या सनदी अधिकाऱ्याचा त्यादिवशी प्रत्यय आला. मी माझे व्हिजिटिंग कार्ड आतमध्ये पाठविताच श्रीमती नयना गुंडे मॅडमनी ताबडतोब मला व लातूरचे श्री ओम प्रकाश जाधव यांना आतमध्ये बोलाविले. मी थोडक्यामध्ये त्यांना मिशन आयएएस समजावून सांगितले.

 

त्या म्हणाल्या हा उपक्रम चांगला आहे .हा संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या विभागात राबविण्यासाठी मला जे काही करता येण्यासारखे आहे ते मी करणार आहे. माझे अधिकार क्षेत्र फार मोठे आहे. तुमचा फार मोठा नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल तर मला निश्चितच सांगा. आता तुम्ही आमचे अपर आयुक्त तसेच त्या त्या विभागाचे आदिवासी प्रकल्प अधिकारी त्यांना भेटून हा प्रकल्प त्या त्या विभागात राबवू शकता.

 

आम्ही मॅडमला मिशन आयएएसची पुस्तके सप्रेम भेट दिली. मॅडमबरोबर पुस्तके देत असताना छायाचित्र काढले. आणि लगेच नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात निघालो. तेथील आदिवासी प्रकल्प अधिकारी बुलढाण्याचे सुपुत्र श्री विशाल नरवाडे हे माझे मित्र आहेत. ते आता सांगली येथे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आम्ही त्यावेळी त्यांना भेटलो. त्यांनी लगेच मिशन आयएएस त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील कळवण विभागामध्ये राबविण्याचा निर्णय घेतला.

 

श्रीमती गुंडे मॅडम गोंदियाला असताना श्री शिवाजी विद्यालयात कार्यरत असणाऱ्या माझ्या देवरीच्या मिशन आयएएस च्या विभागीय कार्यकर्त्यांचा श्री संजय काशीवार यांचा मला फोन आला. ते म्हणाले आपल्या मिशन आयएएसच्या देवरीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे मॅडमला भेटायला जायचे आहे. मॅडमची कन्या आयएएसची तयारी करीत आहे याची मला कल्पना होती. माझे सन्मित्र श्री राजेश खवले हे तेव्हा गोंदियातच राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. मी त्यांना आमचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील शिवाजी विद्यालयाची ज्युनिअर आय ए एस ची टीम श्रीमती नयना गुंडे मॅडमला भेटावयास गोंदियाला येत आहे असे सांगितले. ते म्हणाले नक्की पाठवा . जिल्हाधिकारी मॅडम खूप पॉझिटिव्ह आहेत. तुमच्या मुलांना नक्की भेटतील.

 

आमचे मिशन आयएएसचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील विद्यार्थी गोंदिया जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांना भेटावयास गेले. मॅडमने त्यांचे मनापासून स्वागत केले. त्यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. इतक्या लहान वयापासून ही मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहात हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचा मनमोकळा स्वभाव पाहून विद्यार्थी अजूनच प्रफुल्लित झाले. श्रीमती नयना गुंडे यांनी सर्व मुलांचे व त्यांच्याबरोबर आलेल्या शिक्षकांचे आदरतिथ्य केले. मुलांनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांना प्रश्न विचारण्याचा आनंद घेऊनच हे सर्व शालेय विद्यार्थी देवरी ह्या आदिवासी भागात असलेल्या शाळेत परत गेले. परत जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तृप्ततेचा समाधानाचा भाव दिसत होता. आणि ते घडले होते केवळ कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमोकळ्या व विद्यार्थीमुख भेटीमुळे. आदिवासी विभागातील हे विद्यार्थी जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे मॅडम यांना भेटून प्रेरित झाली होती.

 

श्रीमती नयना गुंडे मॅडम आता अमरावती विभागात विभागीय आयुक्त म्हणून आल्या आहेत. त्या जेव्हा रुजू झाल्या त्यादिवशी माझे जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र दांडगे यांच्या मला निरोप आला. रात्रीचा एक वाजला होता. मी अमरावती शहरात नव्हतो. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड यांच्या हस्ते नाशिकला होणाऱ्या माझ्या जीवन गौरव सत्कारानिमित्त मी अमरावती वरून निघालो होतो.

श्रीमती नयना गुंडे अमरावती येथे विभागीय आयुक्त म्हणून आल्या आहेत याचा आनंद तर झाला आहेच पण त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्याबरोबर चर्चा करणाऱ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या त्यांना वेळ देणाऱ्या व त्यांच्याबरोबर सामूहिक छायाचित्र काढणाऱ्या एका चांगल्या अधिकाऱ्याचे अमरावती विभागात आगमन झाले आहे ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे.

 

मॅडमची मुलगी देखील तीन वर्षांपूर्वी सनदी अधिकारी झाली आहे. केवळ आपल्याच पाल्याकडे लक्ष न देता इतरही पाल्यांकडे त्याच भावनेने लक्ष देणाऱ्या व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आवड असणाऱ्या एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विभागीय आयुक्त अमरावतीला रूजू झालेल्या आहेत ही आमच्या मिशन आयएएस सारख्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. अशा चांगल्या अधिकाऱ्यांमुळे चळवळी अजून बळकट होतात लोकाभिमुख होतात. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या श्रीमती नयना मुंडे मॅडम याना अमरावती विभागात काम करण्यासाठी शुभेच्छा .

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा