You are currently viewing कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

कुडाळ

जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे कोल्हापूर सनराईज हॉस्पिटल यांच्या वतीने आज सकाळी 11 वाजता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे दीपप्रज्वलन करून शुभारंभ रुग्ण कल्याण समिती सदस्या सौ. रश्मी नाईक व अधीक्षक डॉ. संजय वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर (सावंतवाडी), डॉ. सौ. सुशांता कुलकर्णी, सनराईज हॉस्पिटलचे मार्केटिंग कन्सल्टंट शिवाजी बनके, डॉ. सुरेश कुमार मुळीक, मार्केटिंग मॅनेजर मदन गोरे, तसेच परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी अधीक्षक डॉ. वाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री
*राजू मसुरकर यांचे मार्गदर्शन -* रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करताना मसुरकर म्हणाले, 2011-12 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील 36 पैकी फक्त 8 जिल्ह्यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मंजूर केली होती. उर्वरित 28 जिल्हे वंचित होते. मी सोने-चांदी व्यावसायिक असून माझ्याकडे अनेक रुग्ण उपचारासाठी दागिने विकायला यायचे, ते त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहून मला वेदना व्हायच्या. म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो दोन वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती सावंतवाडी राजवाडा इथे कै राणी सत्वशीला देवी भोसले यांना भेटण्यासाठी आले असताना तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांना जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी निवेदन दिले. व आग्रहपूर्वक मागणी करून उर्वरित 28 जिल्ह्यांना या आरोग्यदायी लाभ मिळावा माझ्या आग्रहास्तव महिन्याभरात संपूर्ण 36 जिल्ह्यांसाठी ही योजना मंजूर झाली त्यामध्ये 14 कोटी जनतेपैकी. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला पिवळे केसरी अंत्योदय अन्नपूर्णा रेशन कार्ड व आधार कार्ड असलेल्या व्यक्तींना ही आरोग्यदायी योजना. मंजूर करण्यात आली होती . त्यावेळी 1.5 लाख व किडनीसाठी 2.5 लाखापर्यंत मोफत उपचार, औषधे, जेवण व एसटी प्रवास मिळत होता.

आज 13 वर्षांनंतर या योजनेचे नाव प्रथम महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आता *प्रधानमंत्री आयुष्मान भारत – महात्मा फुले जन आरोग्य योजना* झाले आहे. यामध्ये कुटुंबाला दरवर्षी 5 लाख आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठांना 10 लाख (वय वंदना) पर्यंत मोफत उपचार मिळतात. महाराष्ट्रातील 1400 खाजगी रुग्णालयांमध्ये 2399 प्रकारच्या शस्त्रक्रिया तर शासकीय रुग्णालयात 116 प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. प्रत्येकाने ई-सेवा केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्या कुटुंबाकडे हे प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड नसल्यास या आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही

गेल्या 26 वर्षांपासून मी जात-पात धर्म, पक्ष, गरीब-श्रीमंत न पाहता आरोग्य रुग्ण सेवा करतोय, कुठलाही पुरस्कार घेत नाही, यापुढे सुद्धा घेणार नाही ईश्वराचा सेवक म्हणून ही रुग्ण सेवा करतोय, असेही मसुरकर म्हणाले. 2399 प्रकारच्या मोफत शस्त्र घ्या खाजगी रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता यासाठी सर्व गोरगरीब व सर्व सामान्य जनतेने याचा आरोग्यदायी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी केले

त्यानंतर शिवाजी बनके यांनी सनराईज हॉस्पिटलच्या योजना व मोफत शस्त्रक्रियांची माहिती दिली. आभार प्रदर्शन रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय वाळके व कोल्हापूर मार्केटिंग मॅनेजर मदन गोरे यांनी आभार मानले. या शिबिरात अनेक रुग्णांनी तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील दोन दिवसात कोल्हापूर येथे शस्त्रक्रियेसाठी सन राईस रुग्णालयाच्या वतीने बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा