You are currently viewing जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आहना पालव हिचा द्वितीय क्रमांक
Oplus_16908288

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आहना पालव हिचा द्वितीय क्रमांक

सांगली येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड; मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्यासह शिक्षक-शिक्षिकांकडून अभिनंदन

कुडाळ :

कुडाळ कमशिप्र मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी आहना पालव हिने उत्तम कामगिरी करीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन आहनाचे अभिनंदन केले.

तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी शितल शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनीही आहनाचे अभिनंदन केले.

प्रशालेचे शिक्षक प्राजक्त चव्हाण सर, तसेच मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर सर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांचेही मार्गदर्शन मिळाले. आहनाच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा