You are currently viewing फुले
Oplus_16908288

फुले

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फुले*

 

फुले जरी दिसती सु कोमल

सुगंधी, विविध रंगीत सुंदर देवावरी,केशकलापी,शवावरी

आयुष्य असे अवघे क्षणभंगुर

 

जाण असे त्यांस स्वतः चीच

परि हसतच फुलती आनंदाने

सुगंधा रंगांची करीत उधळण

स्वागतकरित सर्वांचेहर्षभराने

 

रमणीय गुच्छ झुबके उद्यानी

बहारदार येती हर्षे मोहरुनी

निर्भेळ क्षण ते आनंदेवाटुनि

दिमाखात सर्व जना तोषवुनि

 

अशा सुमनांसम जीवनअसावे

कुणा उगा कधी ना दुखवावे

आनंदाचे स्वैर गीत गातजगावे

मधुकणांचे चषकपांखरा द्यावे

 

 

जलसरोवरी की, जमिनीवरती

वेलीवरी असो की वृक्षावरती

कुंडीतअसोकी,फुलबागेमध्ये

पुष्पगंध स्मितलकेरी विहरती

 

संदेश एक असे जनांस त्यांचा

असले जीवन क्षणभंगुर जरी

आदर्श सन्मान जुन्या पिढीचा

यशवंत दिग्गज कीर्ती माघारी

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कला शिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा