You are currently viewing गणपती घरात असतानाही रामपुरुष युवा मित्र मंडळाची दमदार कामगिरी

गणपती घरात असतानाही रामपुरुष युवा मित्र मंडळाची दमदार कामगिरी

गणपती घरात असतानाही रामपुरुष युवा मित्र मंडळाची दमदार कामगिरी

गोवा बांबोळी येथे रक्ताची तात्काळ गरज असताना अण्णा परब व राजन धानजी यांचे रक्तदान; मंडळाचे सर्वत्र कौतुक

शिरोडा :

गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाही सामाजिक बांधिलकी जपत शिरोडा परबवाडी येथील रामपुरुष युवा मित्र मंडळाने कौतुकास्पद कामगिरी केली. गोवा येथील बांबोळी रुग्णालयात रक्ताची तात्काळ गरज असल्याची माहिती मिळताच मंडळाचे देऊ उर्फ अण्णा परब व राजन धानजी यांनी तत्काळ गोवा गाठून रक्तदान केले.
गणपती बाप्पा घरात असतानाही सामाजिक कर्तव्याला प्राधान्य देत गरजू रुग्णासाठी रक्तदान केल्याने त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही ‘सामाजिक सेवा हीच खरी भक्ती’ या भावनेतून मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे रामपुरुष युवा मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा