You are currently viewing गणेशभक्तांना घेऊन ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना!

गणेशभक्तांना घेऊन ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना!

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून चाकरमान्यांचा मोफत व सुरक्षित प्रवास

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास मोफत व सुरक्षित व्हावा, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर येथून ही रेल्वेगाडी कुडाळ, कोकणच्या दिशेने रवाना झाली.

शिवसेना नेते निलेश राणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी या उपक्रमामुळे प्रवासाची मोठी सोय झाली असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा