You are currently viewing गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ
Oplus_16908288

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ

मुंबई / प्रतिनिधी :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बस सेवेचा आज मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारा हा उपक्रम असून, या मोफत बससेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.

या शुभारंभप्रसंगी स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा