*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण मज भेटला*
घन घन भरल्या नभातुनी
सरसर आल्या पावसातुनी
रविकिरणांच्या स्पर्शातुनी
*श्रावण मज भेटला*
गडगडणार्या जलदातुनी
चंचल चपला नृत्यातुनी
दिपविणार्या प्रकाशातुनी
*श्रावण मज भेटला*
हिरव्या हिरव्या कुरणांतुनी
वनदेवीच्या शृंगारातुनी
सौरभ भरल्या पवनातुनी
*श्रावण मज भेटला*
इंद्रधनूच्या रंगांतुनी
सारंगाच्या पिसार्यातुनी
भ्रमराच्या गुंजारवातुनी
*श्रावण मज भेटला*
गौरीहराच्या पूजनातुनी
राखीच्या पावन बंधनातुनी
दधी दुग्धाच्या घटाघटातुनी
*श्रावण मज भेटला*
प्रतिदिनी श्रावण भेटत होता
कळले नाही मास संपला
सर्जा राजाच्या प्रेमाने
पिठोरी अवसेच्या वाणाने
श्रावण सरला श्रावण सरला
कालचक्र हे अविरत चाले
पूर्ण आवर्तन होईल
घडी घडीने पुढे चालता
श्रावण पुनश्च येईल
अरुणा मुल्हेरकर
