You are currently viewing दहीहंडी
Oplus_16908288

दहीहंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दहीहंडी*

 

हंड्या झुंबरं टांगले

छता छता सजविले

महिरीप ही सजली

दही हंडीची धमाल उठलेली

 

पिरेमात मी तिच्या पडलो रं कंदी ?

जडला जीव हा बापुडा

कळलेच नाही मले

किसन देवंच जणु अवतरला व्हता फुडें

 

माझ्या मनामंदी

रुंजी सदा न कदाची

कृष्ण जन्माची मले

ओढ सदा न कदाची

 

त्यानं शंख बी व्हता वाजविला

व्हती बांसुरी बी वाजीवली

पिरेम धून बासरीवरी

कर्तव्य ध्वनी शंखामंदी

 

तोडले व्हते ते सारे बंध

वलांडल्या व्हत्या साऱ्या सीमा

भवताल चे ते भवताल सारे

किसनदेवा झाले व्हते बघ तुझे

 

निमित्याने निमिष्मात्र

ते घडू नये कवा बी

हंडी दह्याची फोडीता

फुटू नये हातपाय कुणाचे बी

 

उभारण्या ते मनोऱ्यावरी मनोरे

जल्लोष करीत ते व्हते

ते सारे मान्यवर व्हते मंचकावरिलें

एकही त्यांच्या घरातला नव्हता मनोऱ्यावरिलें

 

हंड्या झुंबर टांगले

जीव माझा लागला टांगणी

परतेल ना घरा हर गोविंदा

हातपायी नि मस्तक धडे?

 

—–राजा जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा