*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ मानसी बापट लिखित लज्जतदार पाककृती*
*पोह्याचे वडे*
*साहित्य:*
1 वाटी पोहे भिजवून, 1 बटाटा उकडून, हिरवी मिरची आले वाटून 1 चमचा किंवा चवीनुसार, तांदुळाचे पीठ 2 चमचे, चवीनुसार मीठ छोटी वाटी कोथिंबीर चिरून, बेसन पीठ 1 छोटी वाटी,
आणि तळणीसाठी तेल
*कृती..*
प्रथम एका भांड्यात पोहे, उकडलेला बटाटा कुस्करून आणि सर्व जिन्नस बेसन सोडून एकत्र कालवावे.
दुसरीकडे बेसन घेऊन त्यात मोहन घालावे आणि मीठ घातल्यानंतर पाणी घालून पीठ भिजवावे. ह्यात भिजवताना वडे कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही थोडे वरणाचे पाणी घालू शकता किंवा 1 चमचा तांदूळ पीठ.
आता कढई मध्ये तेल गरम करायला ठेवायचे.
पोह्याचे सारण हातात घेऊन त्याला तुमच्या आवडीचा आकार द्यायचा आणि बेसन पिठात घालून लगेच कढई मध्ये सोडून सर्व वडे तळून घ्यायचे.
चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करायचे
*मानसी बापट*
