*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ संध्या कुलकर्णी यांची स्वादिष्ट पाककृती*
*उपवासाची इडली आणि चटणी*….
*साहित्य*_: दीड वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा, पाणी ,मीठ, तेल.
*कृती* _: भगर आणि साबुदाणा दोन्हीही दोन चार पाच तास भिजत ठेवले. त्यानंतर ते पाणी टाकून फार पातळ नाही फार घट्ट नाही असे वाटून रात्रभर झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात थोडा सोडा घालून मीठ व थोडे तेल घालून नेहमीप्रमाणे इडल्या केल्या मस्त झाल्या..😋👌.
*उपवासाची चटणी*.
सर्व अंदाजे भाजलेले शेंगदाणे सुके खोबरे हिरवी मिरची कोथिंबीर सैंधव मीठ थोडी साखर लिंबू रस हे सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घेतले त्यावर तेल आणि जिरे याची वरून फोडणी दिली ही उपवासाची चटणी इडली, आप्पे, डोसा, साबुदाणा वडे, साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालपीठ बरोबर मस्त लागते…😋👌
*सौ संध्या कुलकर्णी *
