You are currently viewing दहीहंडी

दहीहंडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दहीहंडी*

 

आज माझ्या घरी आला

गोकुळीचा नंदलाला

दिन जन्माष्टमी सण

साजरा हो करू चला ॥धृ॥

 

यशोदेचा नटखट

सुदामाचा मित्र ग्वाला

राधेचा तू प्रीत कान्हा

आज भक्ता घरी आला ॥१॥

 

घर सजवू या चला

मंडप महिरपीला

पाळणा फुलवू फुला

झोका झुलवूया चला ॥२॥

 

कृष्ण जन्म स्वागताला

नाचू गाऊ खेळू चला

प्रीत देऊ भेटी घेऊ

संगीत वाजवू चला ॥३॥

 

कोणी व्हा रे गोपाल

रंग संग रंगू चला

कोणी होऊनी गोविंद

दहीहंडी फोडू चला ॥४॥

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*(चांदवडकर ) धुळे.*

7588318543.

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा