You are currently viewing ग्रामपंचायत तरंदळेच्या पाठपुराव्याला यश – महावितरणकडून तातडीने कामे पूर्ण

ग्रामपंचायत तरंदळेच्या पाठपुराव्याला यश – महावितरणकडून तातडीने कामे पूर्ण

ग्रामपंचायत तरंदळेच्या पाठपुराव्याला यश – महावितरणकडून तातडीने कामे पूर्ण

तरंदळे (ता. कणकवली) :

गेल्या अनेक महिन्यांपासून तरंदळे गावात विजेच्या लाईन, खांब आणि ट्रान्सफॉर्मरच्या ज्या समस्या होत्या, त्या संदर्भात ग्रामपंचायत तरंदळेने महावितरणकडे वेळोवेळी केलेल्या लेखी पत्रव्यवहाराला अखेर यश आले आहे.

ग्रामपंचायतीने केलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महावितरणने गावातील अनेक कामे पूर्ण केली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

या बद्दल महावितरणचे आभार मानण्यासाठी आज ग्रामपंचायत तरंदळेच्या वतीने कणकवली येथे महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

*यावेळी प्रामुख्याने उपस्थित अधिकारी :*
*१) मा. श्री. जयंतीलाल भामरे साहेब – कार्यकारी अभियंता, कणकवली विभाग*
*२) मा. श्री. संतोष पालवे साहेब – उप कार्यकारी अभियंता, कणकवली उपविभाग*
*३) मा. श्री. सचिन राऊत साहेब – उप कार्यकारी अभियंता*
*४) मा. श्री. रोशन तिरपुडे साहेब – सहाय्यक अभियंता, कणकवली ग्रामीण – २*

यावेळी कार्यकारी अभियंता मा. भामरे साहेब यांनी सांगितले की, “तरंदळे गावाच्या विकासासाठी आणि वीज समस्या कायमची सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामपंचायतीने ज्या पद्धतीने पाठपुरावा केला तो कौतुकास्पद आहे. उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील.”

या प्रसंगी तरंदळेचे सरपंच *श्री. सुशिल विजय कदम*, माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष *श्री. सुधीर सावंत*, माजी तंटामुक्ती अध्यक्ष *डॉ. सत्यवान राणे*, ग्रामपंचायत माजी सदस्य *श्री. देवा रावले* उपस्थित होते.

सरपंच श्री. सुशिल कदम म्हणाले, “केवळ पत्र देऊन न थांबता, त्याचा पाठपुरावा केल्याने कामे होतात हे आज सिद्ध झाले. भामरे साहेब, पालवे साहेब, राऊत साहेब आणि तिरपुडे साहेब यांनी आमच्या गावच्या समस्या स्वतःच्या समजून तातडीने सोडवल्या, त्याबद्दल संपूर्ण तरंदळे गावाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो. महावितरण आणि ग्रामपंचायत यांच्यातील हा समन्वय असाच पुढे राहील.”

ग्रामपंचायत तरंदळे तर्फे सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार.

*- ग्रामपंचायत तरंदळे*

प्रतिक्रिया व्यक्त करा