कुडाळ रेल्वे स्टेशन मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल म्हणजे शासकीय बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी इंजीनियरिंगचा अजब गजब नमुना.
*गणेश चतुर्थी पुर्वी पुलावरील बॅरिकेटिंग करणे तसेच रस्ता सुस्थितीत न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा.*
कुडाळ
कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीच बांधण्यात आलेला ब्रिज म्हणजे कुडाळ बांधकाम विभागाच्या इंजीनियरिंग स्केलचा अजब गजब नमुनाच ठरलाय. बांधकाम विभागामार्फत एखादा रस्ता अथवा ब्रिज बांधण्यापूर्वीच तेथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच त्याचे इस्टिमेट केले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी योग्य उपायोजना करणे क्रमप्राप्त असताना या पुलाच्या दुतर्फा कोणत्याही प्रकारे बॅरिकेट बांधलेले नाहीत. सदर पुलावर अतिवृष्टीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पूर देखील येत असतो त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रेल्वे मार्गे येणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणारे रिक्षा तसेच खाजगी वाहनांची संख्या लक्षात घेता त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती जास्त प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच बांधकाम करण्यात आलेल्या सदर पुलावरील भागात मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर कुडाळ रेल्वे स्टेशन रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दुतर्फा सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी बॅरिकेटिंग तसेच रस्ता सुस्थितीत न आणल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मार्फत भिकमागो आंदोलन करत जमलेले पैसे बांधकाम विभाग कुडाळ यांना पुलावरील बॅरिकेटिंग बांधण्याकरिता देणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
