पक्षकार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे – प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन बळकटीसाठी आडवलीतील कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात प्रवेश
सावंतवाडी
पक्षकार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पक्षाचे प्रदेश चिटणीस श्री. सुरेश गवस यांनी आज सावंतवाडी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने मालवण तालुक्यातील आडवली येथील सक्रिय कार्यकर्त्यांनी श्री. सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षात प्रवेश केला. सावंतवाडी येथील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी सुनंद सिताराम कदम, अमोल कदम, राजेंद्र कदम, संजय जाधव यांच्यासह आडवली गावातील सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून त्यांना पुढील पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गावपातळीपासून व्यापक जनसंपर्क वाढविण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाला सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मघेंद्र देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष रामभाऊ सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, संदीप राणे, शिरोडकर, विजय कदम, गुरुदत्त कामत, सत्यजीत देशमुख, ॲड. चेंदवणकर, लक्ष्मण गवस, धर्मजी गावडे, प्रभाकर गावकर, सतीश नाईक, रिद्धी परब, रोहन परब यांच्यासह नितेश पाटील, शशिकांत तळावणेकर, विलास पावसकर, ऑगस्टीन फर्नांडिस, प्रकाश गावडे, डॉ. तुषार भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आडवली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार असून, आगामी काळात जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
