You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण संवर्धन, देशप्रेम आणि बंधुभावाचा संदेश 

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण संवर्धन, देशप्रेम आणि बंधुभावाचा संदेश 

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण संवर्धन, देशप्रेम आणि बंधुभावाचा संदेश

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे रक्षाबंधनानिमित्त देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, सर्जनशीलता , पर्यावरण संवर्धन आणि बंधुभावाचा संदेश देणारे विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
भारतीय टपाल खात्याच्या ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या तयार करून त्या सीमेवरील सैनिकांना पाठविल्या. राख्यांसोबत जवानांप्रती प्रेम, आदर, कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त करणारे भावपूर्ण संदेशही पाठविण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून करून देण्यात आली.
याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कल्पकतेने विविध प्रकारच्या आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागात शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत एकमेकांना राख्या बांधल्या, औक्षण केले व मिठाईचे वाटप केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.
‘एक राखी सैनिकांसाठी’ व राखी बनविणे उपक्रमासाठी श्रीम. इंतिझिया फर्नांडिस, श्रीम. फरजाना मुल्ला, श्रीम. अर्चिता सुभेदार यांनी मेहनत घेतली तर रक्षाबंधन साजरे करण्यासाठी श्रीम. सेलिन बर्नार्ड, श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. अनघा आयरे व श्रीम. सिद्रा शेख यांनी विशेष मेहनत घेतली तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.
या उपक्रमांबद्दल मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संचालक श्री. डी. टी. देसाई, सह-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा