You are currently viewing सण आणि संस्कृती

सण आणि संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*सण आणि संस्कृती*

 

भारतीय संस्कृती…. हा जगाचा अभ्यासाचा विषय झालेला आहे. ऋतू व हवामान आणि पिके याला विचारात घेऊन साजरे होत असलेले सण, त्यातल्या परंपरा, रितीरिवाज, याबरोबरच अध्यात्म याची योग्य सांगड घातलेली आहे.

“अतिथी देवो भव.”हे आमचे महत्वाचे संस्कार आहेत. भुकेलेल्या जिवाला अन्न, तहानलेल्याला पाणी आणि दीनदुबळ्यांना सहाय ही आमची संस्कृती आहे.

समाजास अपमानित करणा-या, दु:ख देणा-या रूढी भारतीय समाजसुधारकांनी ऊखडून टाकल्या.

सणवार व परंपरा जपताना ज्या समाजाच्या हिताच्या, सौख्याच्या आहेत त्याच पुढे नेल्या व जाचक नष्ट केल्या.

आपले सण मांगल्य, पावित्र्य याबरोबर समाजसौख्य घेऊन येतात. अपवाद काही सोडले तर बरेचसे सण आपण एकत्र सारे आनंदाची देव घेव करत साजरे करतो

शिशिर संपताना गारठा कमी होतो व शेतात गहू हरभरा, तीळ ऊस कापूस, काही भाज्या फळे तयार होतात. म्हणुनच संक्रांत हा सण आपण तीळ हे स्निग्ध व गुळ हा ऊत्साह वाढवणारा असा एकत्र तिळगूळ एकमेकांना देत आनंदही वाटतो

येणा-या वसंताचे स्वागत करतो. कृतज्ञता म्हणुन वाण म्हणजेच दानधर्म करतो.

पाठोपाठ गारठा पळवून लावणारी होळी गुळ हरभरा वापरून पुरणपोळी करतो व होळी साजरी करतो. जूने वैर गैरसमज विसरून नव्याचे स्वागत करतो

कूप्रवृत्तीची होळी करतो.

चैत्र तर मंगल व पवित्र अशा भावनांचा मेळ घालत येतो.

पहिलाच दिवस रेशमी भरजरी वस्त्र वापरून हार बत्ताशांची माळ घालून ऊंच गुढी ऊभारतो व विजयाचा आनंद साजरा करतो. रामराज्याची आठवण ठेवतो.

रामजन्म, हनुमानजन्म हे भक्तीभावाचे प्रतिक साजरे करतो.

अक्षय तृतियेत “अक्षय जलदान”या भावनेला पुजतो.

वर्षाऋतूत पाऊस, कमी प्रकाश, कमी भाज्या इ. मुळे चातूर्मास ही परंपरा पाळतो. आषाढ सोहळा, पंढरपूर दर्शन, एकादशी ऊपवास यात झिम्माड पावसाचा आषाढ अध्यात्मात रमत साजरा करतो.

जेष्ठात सुहासिनी वडपूजन करून सौभाग्याचे दान मागतात व सत्याचीच बाजू धरतात.

नागपंचमी, बैलपोळा हे शेतकामातले सोबती म्हणुन कृतज्ञता व्यक्त करत श्रावण साजरा होतो. पूर्ण भर हा ऊपासना, व्रते कहाण्या कथा यावर असतो. कृष्णजन्माने कान्हा व यशोदेचे नाते आदराने आठवले जाते.

नारळी पोर्णिमेला वर्षभर ऊद्योग व अन्न देणारा सागर पुजला जातो. नविन काळाचे स्वागत होते. कोळ्यांचे जीव वाचव म्हणुन प्रार्थना होते.

नवरात्र, दसरा आणि दिवाळी तर सणांचा ऊत्सवच असतो.

येणारी नविन पिके, हिवाळा, बदलणारा ऋतू व जून्याचा त्याग करायला शिकवणारी पानगळ यांचा विचार यात केलेला आहे. सृजनाचे महत्व शिकवले आहे.

असा एकंदरितच फार विचार करुन सणवार बसवलेले आहेत.

यात जनजागृतीसाठी गणेशोत्सव, नवरात्र एकत्र साजरे होतात, काहीच घरी व काही परस्परात साजरे होतात. समाज कुटूंबे, नातीगोती एकत्र यावीत, विचार जुळावेत, सोबत व्हावी हेच ऊद्देश सणांमागे असतात. हे भारतीय संस्कृतीचे विशेष आहे.

अध्यात्म, कृतज्ञता, जिव्हाळा,जपणे, नविन गोष्टींचे स्वागत व समाज हित यात साधले आहे.

यात विशेष म्हणजे स्त्रिया ज्या सतत ऊंबरठ्याच्या आत डांबल्या गेल्या होत्या त्यांचाही विचार समाज म्हणुन केला गेला.

हळदीकुंकू समारंभ, पूजा, मंगळागौर, हरतालिका, नवरात्र, दिवाळी संक्रांत यात त्यांना नटणेसजणे, नविन वस्त्रे, मैत्रिणींना भेटणे मिरवणे बाहेर पडणे ह्याचा आनंद दिला आहे. सण हा एक विरंगुळाच आहे. भाऊ ,भावंडे, माहेरची माणसे भेटणे हे पण सौख्य भाऊबीज राखी यातून दिलं आहे.हा झाला मागचा काळ. पण आता स्त्री कमावती, सुशिक्षित ऊद्योगी आहे.

तिने आधुनिक दृष्टीकोनातून हेच सणवार ऊत्तम साजरे करायचे मार्ग स्विकारलेत.

ज्या गोष्टी घरी करत त्याच बाजारात गरजू बायका करून विकतात त्यांना मदत होते यासाठी आजची कमावती स्त्री सारे विकत आणते.

हळदीकूंकू ये जा करताना लोकल, किंवा कामाच्या जागी करते.

दान म्हणुन गरजूला चांगली घसघशीत मदत करते.

देवीला फळे फुले वाहुन पूजा ऊरकते.

नको त्या गोष्टींवर खर्च न करता योग्य तिथे अन्नदान वस्त्रदान जलदान करते.

परवडेल अशा तिर्थयात्रा करते. जुन्या सवयी सोडून नव्यांचे सिमोल्लंघन करते. वृद्धाश्रम, अनाथागृह, इस्पितळे इथे भेटी देते. विकलांगांना एकत्रित मदत पोचवते.रक्तदान करतात.

सहली संमेलने करून नातेसंबंध वाढवतात.

मोबाईल, नोकरी, मुलांच्या शालेय जबाबदा-या यातुन लोकांनी मार्ग काढलेत.

आजही आपल्या संस्कृतीचे महत्वाचे आधार स्तंभ म्हणजे… लग्नसंस्था, बालसंगोपन, जेष्ठांची काळजी, कुटूंबसंस्था, घरपण, नातेसंबंध, चारित्र्य, हे सारे जपलेले आहे.

समस्या असतातच पण समाज एकत्र येऊन सोडवेल हा विश्वास आहे.

“भारतात विविधततेतुन एकता”हा मंत्रच आहे. प्रत्येक प्रांताचे पोषाख, खाणेपिणे, सणवार, पिके हवामान घरे हे सारे वेगळे असले तरी भारतीयत्व ही परंपरा जपली आहे. थोडाफार फरक पडतो पण मूळ एकच असते.

भारतीय संस्कृती गौरवशाली म्हणुनच आहे.

 

अनुराधा जोशी

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा