You are currently viewing पावरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या हिना सारंगचे दैदिप्यमान यश

पावरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या हिना सारंगचे दैदिप्यमान यश

पावरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या हिना सारंगचे दैदिप्यमान यश

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. हिना सारंग हिने मसल्स क्रियेशन फिटनेस, आचरा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
हिनाने आपल्या सामर्थ्य, चिकाटी आणि जिद्दीचे दर्शन घडवत ४३ किलो वजन गटात पावरलिफ्टिंग व डेडलिफ्ट प्रकारात रौप्यपदक मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४७ किलो वजन गटात पावरलिफ्टिंग व डेडलिफ्ट प्रकारात सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीतून तिची मेहनत, शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि क्रीडाक्षेत्रातील समर्पण दिसून आले. दोन वेगवेगळ्या वजनी गटांत तिने मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले. हिनाच्या या यशामुळे ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
कु. हिना सारंगच्या या शानदार कामगिरीबद्दल प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्गाकडून कु. हीना सारंग हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा