*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संत नरहरी सोनार”*
नरहरी सोनार पंढरपूरचे ज्ञात संत
धन्य पंढरपूर क्षेत्र संतांचे माहेर स्थान IIधृII
जन्मले पंढरी नगरीत सोनार घराण्यांत
बालपणापासून त्यांना ईश्वर भक्तीची आस
शिव उपासक नित्य बेल फुले अर्पित भक्तII1II
सुवर्णकार म्हणूनच त्यांची सर्वत्र ख्यात
अलंकार कलाकुसर करण्यात निष्णांत
विठूला करावी सोनसाखळी सांगितले धनकोनंII2II
नरहरींनी साखळी बनवली कटीचे मापनं
साखळी मापापेक्षा होई कमी जास्त अद् भूत
नरहरी दुरुस्तीसाठी येईना विठू मंदिरांतII3II
डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी आले देवळांत
माप घेताना व्याघ्र चर्म स्पर्शले शेषनाग गळ्यात
उघडले नेत्र संपले द्वैत झाला शिवाचा दृष्टांतII4II
नरहरींचे भागवत धर्मात अव्वल स्थान
शिव विठ्ठल भक्तीत वेचिले सर्व जीवन
समाधीस्थ ज्ञाना नामदेव चोखा निवृत्तींचे साक्षीनंII5II
©️कवी:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
