डीप लर्निंगमधील संशोधनाची भरारी; सुप्रिया नलावडे यांना पीएच.डी.
‘Sentiment Analysis’ विषयावर अत्याधुनिक संशोधन; ALGO-DeAM संशोधनाला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान
कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात ‘Sentiment Analysis using Deep Learning’ या अत्याधुनिक विषयावर संशोधन पूर्ण करून सौ. सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.
सौ. नलावडे यांनी Deep Learning, Convolutional Neural Network (CNN), Natural Language Processing (NLP) तसेच Optimization Techniques यांच्या साहाय्याने Sentiment Analysis अधिक अचूक व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने संशोधन केले. डिजिटल माध्यमांमधील मजकुरामधून व्यक्त होणाऱ्या भावभावना व मतांचे अधिक प्रभावीपणे विश्लेषण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाचे महत्त्व आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या ALGO-DeAM या संशोधनाला २०२६ मध्ये Journal of Systems Science and Systems Engineering या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशन मिळाले आहे. त्यांच्या संशोधन कार्यातील ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. शामला आर. महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया नलावडे यांनी संशोधनाची यशस्वी पूर्तता केली.
या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठातील प्राध्यापक, सहकारी, कुटुंबीय तसेच मित्रपरिवारातून सौ. सुप्रिया समीर नलावडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
