You are currently viewing कृष्णघन नभी दाटले!
Oplus_16908288

कृष्णघन नभी दाटले!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृष्णघन नभी दाटले!*

 

 

कृष्णघन नभी घनदाट दाटले

अवखळ तयांची लीला चाले

आकाशी धक्कबुक्की गडगड

विद्युल्लतेची तेजाळ कडकड

⛈️

जलथेंब भरभरुन ओघळती

भिजून चिंब चिंब होई धरती

रुद्ररुपी मेघनादे कडकडते

चंचल वीज थरार चमकते.

🌩️

वर्षा नाचते,बेधुंद वार्यासन्गे

नृत्यसौदामिनी,कृष्णमेघासन्गे

घनघनमाला, नभी दाटल्या

थरारती भूमिवरी वृक्षसावल्या.

🌩️

काळोख दाटे,सभोवार परिसरी

पक्षीभयभीत,लपती निजकोटरी

सैरावैरा वनश्वापदे,आसरा शोधती

नाजूकसुमने वेलीवर कोलमडती.

🌦️

नभांगणी लपंडाव सूर्यकिरणांचा

वातावरणी खेळ अन्धारप्रकाशाचा

मृद्गन्ध दरवळ,पुषसुगंध वसुंधरेवर

रुणझुणणारे झरतीअवखळ निर्झर.

🌧️

 

 

स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर,

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा